आपणच ह्या स्थितीस जबाबदार आहोत, त्यामुळेच आम्ही ह्या प्रवासाला सुरुवात केली

Updated: Mar 17, 2020जे असहाय्य आणि क्षमताहीन (अक्षम) असतात, दुर्बल असतात, त्यांच्यासाठी सक्षम व सबल लोक जबाबदार आहेत. अक्षम लोक ही सक्षम लोकांची जबाबदारी आहे. दुर्बल लोक ही सबल लोकांची जबाबदारी आहे. मानवी आयुष्याच्या प्रत्येक पैलूसाठी आणि प्राण्यांसाठीही हेच सत्य आहे. जर सक्षम लोकांनी अक्षम लोकांना मदत करण्यासाठी प्रतिबद्धता दाखवली नाही तर त्या असहाय्य लोकांना आणि प्राण्यांना केवळ दुःख व वेदना प्राप्त होणे निश्चित आहे. आम्ही सर्वांनी स्वतःच स्वतःला यासाठी जबाबदार धरले आणि आमच्या जवळच्या व्यक्तींना आणि मित्रांनादेखील ही जबाबदारी समजावून घेण्यासाठी विनंती केली आणि यातूनच औरंगाबाद शहरातील भटक्या प्राण्यांच्या अन्नाच्या समस्येवर मात करण्यासाठी निधी, साधने, तज्ज्ञ लोकांचे ज्ञान आणि स्वयंसेवकांची फौज या गोष्टी उभारण्याची सुरुवात झाली.

प्राण्यांची अन्नसमस्या हा असा मूलभूत विषय आहे ज्याच्याशी प्रत्येकजण जोडला जाऊ शकतो. कुत्रा, मांजर असे सुमारे पन्नास हजार ते एक लाख भटके प्राणी औरंगाबादमध्ये आहेत. पुणे व मुंबई या शहरांमध्ये तर अश्या प्राण्यांची संख्या अनेक लाख आहे. हे सर्व प्राणी सध्या अन्नपाण्यासाठी दररोज संघर्ष करत आहेत. त्यांच्या समस्यांचे एक वेगळेच जग आहे ज्याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कोठेतरी आपणा सर्वांना याची गरज आहे की आपण एक समाज म्हणून, समूह म्हणून एकत्र यावे, त्यांची समस्या ओळखून त्याकडे लक्ष द्यावे जेणेकरून आपल्या बेफिकीर वृत्तीच्या जखमा त्यांना होणार नाहीत आणि आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे त्यांना होणारा त्रास यापुढे आणखी होणार नाही. आपण आपली जबाबदारी स्वीकारायला हवी जेणेकरून ते कमजोर जीव आपल्यावर अवलंबून व्यवस्थितपणे राहू शकतील.

आम्ही सर्वप्रथम प्राण्यांच्या अन्नसमस्येवर काम करण्याचे ठरवले आहे कारण ही समस्या आहे हे ओळखून आणि समजावून घेणे लोकांसाठी सोपे आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी लोक एकत्र येऊ शकतात. एक सजग समाज कोणतीही समस्या सोडवू शकतो आणि त्यासाठी लागणारे कोणतेही कार्य करू शकतो. म्हणून लोकांनी एकत्र येणे आणि या बेघर प्राण्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अश्या बेघर बेसहारा प्राण्यांच्या समस्या ओळखून त्या सोडवणारे एक संघटन उभे करण्यासाठी लोकांना आकर्षित करणारा मुख्य मुद्दा भूक आणि अन्नसमस्या आहे.

औरंगाबाद शहरातील सर्व भटक्या प्राण्यांना अन्न खाऊ घालण्यासाठी एकत्र येण्याचे व एकमेकांना या कामात मदत करण्याचे आवाहन आम्ही लोकांना करत आहोत. दरम्यान बेघर प्राण्यांच्या मदतीसाठी साधने आणि दळणवळण व्यवस्था निश्चित करण्यासाठी पुणे आणि मुंबई शहरातही एक संघटन उभे करत आहोत.

हे सर्व आपण खालीलप्रकारे करू शकतो :


1. दरमहा काही ठराविक रकमेचे योगदान देण्याचे वचन देणे. शंभर, पाचशे, एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार, पाच हजार, दहा हजार रुपये अशी जी कोणती रक्कम शक्य असेल त्या रकमेचे योगदान दरमहा देण्यासाठी वचनबद्ध व्हावे.

मासिक योगदानाची वचनबद्धता आवश्यक आहे. हे कार्य दीर्घकाळ आणि स्थिरपणे चालू राहण्यासाठी आर्थिक योगदानाचे वचन आवश्यक आहे. एकदा नियमित मासिक आर्थिक योगदान वापरून कामकाज सुरळीतपणे होऊ लागले की इतर विविध देणगीदारांकडून एकाच वेळी येणाऱ्या मोठ्या देणगीचा उपयोग इतर व्यवस्था निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

आपण एकाच वेळी दिलेली मोठी देणगी म्हणजेच वन टाईम कन्ट्रीब्यूशनही स्वीकारतो आणि मासिक आर्थिक योगदानही स्वीकारतो आहोत. मात्र कामकाज चालू ठेवण्यासाठी आवश्यक खर्चाची रक्कम अशी आहे की लोकांकडून नियमित आर्थिक योगदानाचे वचन घ्यावेच लागेल. म्हणूनच आम्ही अश्या मासिक आर्थिक योगदानाचे वचन लोकांना मागत आहोत याची कृपया नोंद घ्यावी.


2. कुत्रे आणि मांजर यांच्यासाठी प्रत्यक्ष अन्नाच्या स्वरूपात योगदान देणे. असे अन्न जे आपण त्यांना खायला देऊ शकतो. आमचे लोकांना असे आवाहन आहे की त्यांनी दरमहा काही ठराविक प्रमाणात अन्नपुरवठा करण्याचे वचन द्यावे ज्यामुळे तेवढ्या प्रमाणात निश्चितपणे अन्न उपलब्ध होईल. याशिवाय आपण एकाच वेळी केलेला (वन टाईम) अन्न पुरवठा पण स्वीकारत आहोत.


3. या कार्याचा प्रचार करणे आणि लोकांना जबाबदारीच्या या जाणिवेत सहभागी करून घेणे.


4. प्राण्यांना खायला देण्यास उपयुक्त असलेले हॉटेलांमधील टाकाऊ अन्न देण्यासाठी हॉटेल मालकांची सहमती मिळवणे. आम्ही आतापर्यंत 20 हॉटेल मालकांशी बोललो आहोत ज्यांच्याकडून एकूण 500 किलोग्रॅम मांसाहारी अन्नपदार्थांचे योगदान मिळत आहे. शक्य त्या सर्व प्रकारे अन्नपुरवठ्याचे प्रमाण वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही 2000 पेक्षा अधिक घरांमधून दररोज 4000 पेक्षा अधिक चपात्या जमा करत आहोत आणि या संख्येत सतत वाढ होत आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी 250 पेक्षा अधिक ठिकाणी पाण्याचे जार ठेवले आहेत .

अनेक लोकांनी आम्हाला हे विचारले आहे की प्राण्यांचा निवारा, त्यांना संकटकालीन मदत करणे तसेच त्यांचे पालन आणि पुनर्वसन या सर्व गोष्टींबाबत आमचा काय विचार आहे. या सर्व हितचिंतक मंडळींना आम्ही हे सांगू इच्छितो की या सर्व बाबींसाठी लागणारा खर्च प्रचंड आहे आणि म्हणूनच आम्ही साधने व निधी गोळा करण्यापासून सुरुवात केली आहे.

आम्ही औरंगाबादमध्ये दोन ठिकाणी प्राण्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे जिथे सुमारे शंभर प्राणी सध्या राहतात. मोठ्या संख्येने प्राण्यांसाठी राहण्याची व्यवस्था उभी करणे खर्चिक आहे आणि त्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागते. आम्ही या दोन निवारा व्यवस्थांची उभारणीही आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन केली आणि यथावकाश ते या प्राण्यांचे घरच बनून गेले. सर्वांनी हे ध्यानात घ्यावे की अन्नपुरवठा करण्याच्या खर्चापेक्षा निवारा उभारणीचे व ते चालवण्याचे आर्थिक गणित पाच ते सहा पट मोठे आहे. म्हणून जास्तीत जास्त प्राण्यांची मदत करायची असेल तर आपले प्रयत्न, आपला निधी आणि आपली साधने अन्नाची समस्या सोडवण्यासाठी केंद्रित करायची गरज आहे.

सध्या आम्ही उभारलेला निवारा हे सुमारे शंभर प्राण्यांचे घर आहे ज्यात कुत्रा आणि मांजर यांचा समावेश आहे. आम्ही त्यांचे पालन करणार आहोत आणि इतर गरजू प्राण्यांचेही रक्षण करणार आहोत. मात्र ही कामे करण्याकरिताही आम्हाला आर्थिक साधनांची गरज आहे. आम्हाला अनेक लोकांनी त्यांची जागा वापरासाठी देण्याचे वचन दिले आहे. आता निवारा उभारणीसाठी आणि ते चालवण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत लागणार आहे. मात्र एवढे सगळे काम होण्यासाठी कोठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून आपण आधी भुकेल्या प्राण्यांची अन्नसमस्या सोडवण्यापासून सुरुवात करायची आहे आणि या बेघर प्राण्यांना खायला अन्न द्यायचे आहे.

या गरजू बेघर प्राण्यांच्या अन्नाचा आणि निवाऱ्याचा - असे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी पुरेश्या आर्थिक वचनाची पूर्तता झाली की आम्ही निवारा उभारणे आणि ते व्यवस्थित चालवणे याकडे लक्ष केंद्रित करू शकतो. तोपर्यंत आम्ही प्राण्यांच्या अन्नसम